आपला जिल्हानांदेडनायगांव

राहेर येथील श्री चक्रधर स्वामी यांच्या मंदिराचे बांधकाम थांबले

निधि मिळत नसल्याने. स्वखर्चतून बांधकाम होत आहे. ...खामनेकर बाबा यांची माहिती.

कुंटूर प्रतिनिधी….
राहेर …  नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मोजे राहेर येथे गोदावरी नदीकाठी श्री चक्रधर स्वामी महानुभव पंथांचे हे पाहून स्पर्शाने स्पर्श झालेल्या ठिकाणी त्यांचे भव्य दिव्य मंदिर बांधकाम करण्यात येत आहे सदर मंदिरासाठी शासनाकडून व ग्रामपंचायत राहेर यांच्याकडून कोणतेही एक रुपयाचा निधी मिळाला नसल्याची माहिती येथील किशोर बुवा खामनेकर महानुभव यांनी माहिती दिली आहे. मंदिराच्या परिसरात असलेला एक हातपंप नादरूस झाला आहे की ते एक महिने झाले ग्रामपंचायतीला राहेर यांच्याकडे माहिती देऊनही हातपंप दुरुस्त केला नाही.
श्री चक्रधर स्वामी हे 12 व्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभव पंथांचे संस्थापक आहेत हे महामानव पंथांच्या तत्त्वांना ज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारापैकी पाचवा अवतार आहेत. इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. 8 50 वर्षाचे राहेर येतील गोदावरी नदीच्या काटे त्यांचे पाऊणस्पर्शाने झालेले स्थान आहे . बारा वर्षे तर करत गोदावरी नदीच्या काठी बसले होते .त्यांच्या पावन स्पर्शाने स्थापन झालेल्या भूमीवर भव्य दिव्य मंदिर बांधकाम होणार व करण्यात येणार असल्याची माहिती ही नागरिकांना मिळाली मात्र येथील पुजारी खामणेकर यांनी मिळून स्वखर्चातून नागरिकाकडून व भक्तगणाकडून देणगी घेऊन या मंदिराची उभारणी करत आहेत. ग्राम पंचायत व शासनाकडून कोणत्याही निधी एक रुपयाचा मिळाला नाही .अशी माहिती किशोर खामनेकर महानुभव बाबा यांनी दिली आहे . येथे हजारो अनुयायी दररोज पूजा करण्यासाठी येत असतात व चक्रधर स्वामी यांच्या समाधीला पावनस्पर्शाने समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिक दररोज येत असतात हजारो पंगती बसून सर्व पंगत येणाऱ्या लोकांना जेवण मिळत असते. राहण्याची सोय तसेच विविध ठिकाणी जाऊन पाण्यासाठी येथील मंदिरामध्ये राहण्यात येतात. येथे चार पुरुष व 15 महिला साधू कार्यरत असून येथे सर्व देवांच्या पुजारी महिला पुरुष यांनी येथे येणाऱ्या सर्व भावीक भक्तांना आपल्या स्वखर्चातून जेवण अर्चन भंडारा तसेच पूजा करण्याचे कार्य करत असतात. त्यामुळे राहेर येथील मंदिरासाठी श्री चक्रधर स्वामी यांच्या मंदिरासाठी सरळ हाताने देणगी देऊन देण्यात यावी व सदर ग्रामपंचायतीने आराखडा बनवून पर्यटन स्थळांमध्ये यांची नोंदणी करण्यात यावी अशी मागणी येथील खामणेकर बाबा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे . तरीही याकडे कोणी लक्ष देत नसून स्वखर्चातून आज पर्यंत सव्वाशे कोटी रुपयांचे एक कोटी 25 लाख रुपयांची मंदिर बांधकाम करण्यात चालू असून त्यांचे काम सध्या सुरू असल्याची माहिती ही यावेळी खामणेकर बाबा यांनी दिली आहे .त्यामुळे हजारो भक्ताचे श्रद्धास्थान असलेले संत श्री चक्रधर स्वामी यांच्या समाधीचे मंदिराचे बांधकाम सुरू असून ह्या बांधकामाला शासकीय व प्रशासनाचा कोणत्याही एक रुपयाचा निधी मिळाला नाही सदर मंदिराची व या समाधी स्थळाची नोंदणी पर्यटन विभागामार्फत करून शासनाच्या निधी देण्यात यावा अशी मागणी येथील महिला व पुरुष पुजारी खामनेकर बाबा यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button