स्वतःचा सत्कार टाळून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्वागतासाठी आलेल्या संगमेश्वर पन्नासेचे केले कौतुक.

नायगाव तालुका प्रतिनिधी ..दि(..११) नायगाव तालुक्यातील गडगा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव पन्नासे यांचा मुलगा संगमेश्वर पन्नासे यांनी जिद्द, चिकाटी आणि परीश्रमाच्या जोरावर पहील्याच प्रयत्नात नगरविकास विभागात नौकरी मिळविली.नूकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.अगोदर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे यथोचित सत्कार करण्यास पुढे सरसावलेल्या संगमेश्वरला थांब बाळा म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी त्याचे शाल, पुष्पगुच्छ देवून कौतुक केले.
गडगा येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पन्नासे हे नेहमीच आरोग्यविषयक व विविध सामाजिक उपक्रम राबवितात.संगमेश्वर पन्नासे यांने वडीलांच्या कष्टाची जाणं ठेवून सर्वसाधारण परिस्थितीत शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला.पहील्याच प्रयत्नात यशस्वी होवून नगरविकास विभागात नगररचनाकार पदी नियुक्ती मिळविली
.संगमेश्वर हा पहिली पासून ते बारावी पर्यंत शाळेत व काॅलेजमध्ये हुशार व शिस्तप्रिय विध्यार्थी म्हणून नावलौकिक कमावला प्राथमिक शिक्षण गडगा येथे घेतले त्यानंतर राजश्री विदयालय अहमदपूर,आर्य चाणक्य विद्यालय जेठवाडा छत्रपती संभाजी नगर, माध्यमिक शिक्षण नांदेडच्या यशवंत काॅलेज येथे, सिव्हिल इंजिनिअर डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल इन्स्टिट्यूट लोणेरे (रायगड), पंढरपूर येथे एमटेक शिक्षण घेत एमपीएससीच्या परिक्षेचा अभ्यास करून परीक्षेत पहील्याच प्रयत्नात नगरविकास विभागात नगररचनाकार पदी नियुक्ती झाली.
सध्या पुणे महानगर विकास प्राधिकरण विभागात कार्यरत आहे.नूकतीच काही दिवसांपूर्वी वडीलासमवेत त्याने ठाणे येथील भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.नियमानूसार त्यांने उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करताना वडील शिवाजीराव पन्नासे यांनी हा माझा जेष्ठ चिरंजीव आहे असे सांगताच उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांनी संगमेश्वर ला अरे बाळा थांब तु माझा सत्कार करु नको मीच तुझा सत्कार करून पुढील यशस्वीतेसाठी अभिनंदन करुन शुभेच्छा देतो.
असे म्हणत शिंदे साहेब यांनी संगमेश्वर पन्नासेचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी ठाण्याचे खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक,माजी मुख्यमंत्र्याचे सचिव मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ.श्रीकांत फाऊंडेशन चे राज्यकक्षप्रमुख नरहरी राऊत, डॉ.सिध्देश्वर पन्नासे अनेक मान्यवर मंडळी ची उपस्थिती होती.



