खाजगी स्कूल बस मधून पडून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू मनुर ते इज्जतगाव रस्त्यावरील घटना…
कुंटूर वार्ताहर..दि(११)
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे इज्जतगाव ते मनुर रस्त्यावरील पुलाजवळ एका खाजगी स्कूल बस ट्रॅव्हल्सच्या मधून पडून पाठीमागच्या टायर खाली आल्याने सहा वर्षीय मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे
. सदर घटना दुपारी दोन वाजताच्या सुमारास इज्जतगाव ते मनुर रस्त्यावर घडली असून स्कूल बस ही परिसरातील पाच गावाचा प्रवास करत अंतरगाव मनुर इज्जतगाव सावरखेड करून घुंगराळा येथील स्वामी विवेकानंद मिडीयम इंग्लिश स्कूल घुंगराळा येथील शाळेसाठी मुले , ये जा करण्याची खाजगी ट्रॅव्हल्स होती.
. सदर मुलगा हा इज्जतगाव येथील आरुष अवधूत डोईफोडे वय 6 असे नाव असून राहणार इज्जतगाव . ही स्कूल बस ट्रॅव्हल्स दररोज मुलांना शाळेसाठी घेऊन जाते व त्यांना घरापर्यंत नेऊन सोडत असते आजही शाळा सुटल्यानंतर सदर ट्रॅव्हल्स मधून एकूण 50 पन्नास मुले खचाखच भरलेली होती. सदर मुलांना घेऊन ट्रॅव्हल्स हे घुंगराळा मार्ग सावरखेड करून मणुर ते इज्जतगावकडे येत असताना इज्जतगाव मधील रस्त्यावरील पुला जवळ आल्यानंतर सदर मुलगा हा बस मध्ये उभा होता . अचानक हेलकाव्याने दरवाजाकडे जाऊन दरवाजाची कुंडी निघाली व वरून खाली आपटला असता पाठीमागच्या टायराखाली आल्याने ट्रॅव्हल्स बस अंगावरून गेल्याने जागीच मुलांचा मृत्यू झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शी चालक यांनी सांगितले.
. मयत झालेल्या मुलाचे वय सहा वर्ष होते तो घुंगराळा येथील स्वामी विवेकानंद मेडीयम इंग्लिश स्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकत असल्याचे माहितीही नागरिकांनी दिली आहे. या प्रकरणातील स्कूलबस ट्रॅव्हल्स कुंटूर पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आली असून बसचालक संजय डोईफोडे राहणार इज्जतगाव यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
मयत आरुष संजय डोईफोडे यांचे शवइच्छेदन करून प्रेत आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे .पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याची माहिती ही पोलीस प्रशासनाकडून मिळाली असून. सदर सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने इज्जतगाव परिसरात शोककळा पसरली असून डोईफोडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुंटूर पोलीस स्टेशन येथे सदर स्कूल बस ट्रॅव्हल्स व सदर चालक संजय डोईफोडे यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करत आहेत.



