आपला जिल्हानांदेडनायगांव

17 हायवेच्या साह्याने दोन दिवसापासून सांगवी येथील नदीपात्रातून अवैध माती उत्खनन

 नाममात्र परवाना लाखो रुपयाचा महसूल बुडीत सांगवी येथील नदीपात्रातून अवैध माती उत्खनन

कुंटूर प्रतिनिधी….दि.१२
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मोजे सांगवी येथील नदीपात्रापासून दहा फुटाच्या अंतरावरूनच माती उत्कलन केले जात आहे. एका शेतकऱ्यांच्या शेतामधून हे माती उत्पन्न होत असून सदर शेतकऱ्यांनी 200 ब्रासच्या परवाना घेतला असल्याची माहिती मिळाली असून सदर ह्या माती गुत्तेदारांनी दोन दिवसापासून 17 हायवा च्या साह्याने जेसीबी च्या साह्याने उत्खनन करत आहेत . सदर रॉयल्टी किती ब्राची आहे व कोणाच्या नावाने घेण्यात आली कोणत्या किती हायवा व जेसीबी .Mh34 AB0729,
Mh26-4157, mh34-8625,Mh26-3566
Mh26-BE7799, Mh26-9019, Mh26 ch 1893, Mh44 -0304,Mh26-0548,
Mh26BE-7824,Mh26-5392, MH30BD-7707, Mh30-4099, Mh26 -5527,, Mh34-9525, सदर हायवा गाडीचे नंबर आहेत. याची माहिती तहसील येथील अव्वल कारखून यांच्याकडे घेण्यासाठी गेले असता त्यांचा मोबाईल बंद होता त्यामुळे माहिती मिळाली नाही.
नाममात्र परवाना व रॉयल्टी भरून तहसीलला लाखो रुपयाचा चुना लावण्याचा प्रकार घडत आहे . याकडे महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत असून नदीपात्राचा सौंदर्य मात्र नष्ट होत चालल आहे . माती उत्खनन करून नदी पात्र पसरट होत आहे. त्यामुळे गुत्तेदारा मार्फत नदीपात्रातून अवैध मार्गाने 17 हायवा एक जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस माती उत्खनन केले जात आहे.  तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून उत्खनन केलेल्या जागेची तपासणी करावी  अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button