आपला जिल्हानांदेडबिलोली

सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथराव होनवडजकर यांचे निधन

प्रतिनिधी गोविंद टोकलवाड..दि(.३१)
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक जेष्ठ नागरिक रघुनाथराव पिराजी होनवडजकर वय ८७ वर्ष यांचे दि. ३० डिसेंबर रोजी सोमवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

स्व. रघुनाथराव होनवडजकर यांच्या पश्चात चार मुल, दोन मुली, सुना ,जावाई नातू असा मोठा परिवार आहे.
रघुनाथराव होनवडजकर यांच्या पार्थिवावर आज दि. ३१ डीसेंबर रोजी मंगळवारी सकाळी ११:३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ते कुंडलवाडी मार्केट कमेटीचे लक्ष्मीकांत होनवडजकर , जालनाचे मुख्याध्यापक गंगाधर होनवडजकर, मुंबई चे पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर, परभणीचे क्रिडा अधिकारी प्रकाश होनवडजकर यांचे वडील होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button