
बिलोली….दि..(१३)
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगीचा अर्थ समजून घेऊयात. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी हा सण साजरा करण्यात येतो. भोगीचा सण हा 13 जानेवारी 2025 साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी हिवाळ्यात मिळणाऱ्या हंगामी भाज्यांची मिक्स भाजी करण्यात येते. या भोगीच्या भाजीसोबत एक विशेष….. भाकरीदेखील खाल्ली जाते. या मिक्स भाजीला जिला भोगी असंही म्हटलं जातं. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. अशात बोचरी थंडीला सुरुवात होते. या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात भोगी साजरी केली जाते. महाराष्ट्रात एक म्हण आहे, जो न खाई भोगी तो सदा रोगी…खरं तर हा सण म्हणजे नात्यांमधील ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी असा त्यामागील उपदेश आहे.
असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं, त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानलं जातं. इंद्रदेवाकडे पृथ्वीवर अमाप पिक पिकावीत अशी या दिवशी प्रार्थना केली जाते. याच पिकं आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली, अनेकांना समृद्ध करत आली, अशी कथा आहे. हेच चक्र अविरतपणे चालत रहावं या हेतूनं भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. भोगी वर, लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते. पहाटेच्या वेळी, लोक लाकूड, इतर घन-इंधन आणि घरातील लाकडी फर्निचरसह शेकोटी पेटवतात जे यापुढे उपयुक्त नाहीत. हे वर्षाच्या खात्यांची समाप्ती आणि दुसऱ्या दिवशी कापणीच्या पहिल्या दिवशी नवीन खात्यांची सुरुवात दर्शवते.
दक्षिण भारतात विशेषतः भोगी पंडीगायी नावाने हा दिवस साजरा केला जातो. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात विविध नावांनी साजरा केला जातो. मत्तू पोंगल,कान्नुम पोंगल अशी याला नावे आहेत.
लेखक
डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे, बिलोली.
8888087513



