आपला जिल्हानांदेडनायगांव

ग्रामपंचायतीने मागवलेल्या  ग्रामरोजगार सेवक पदासाठी उच्चशिक्षित तब्बल पन्नास अर्ज प्राप्त..

मांजरम वार्ताहर..दि(.३)

नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय लालवंडी येथे ग्रामरोजगार सेवक पद रिक्त झाल्यामुळे नवीन ग्राम रोजगार सेवक भरतीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून अर्ज मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार आज पर्यंत 50 अर्ज तेही उच्चशिक्षितउमेदवाराची  प्राप्त झालेली आहेत. त्यापैकी 50 चे 50 अर्ज पात्र झालेले आहेत.
पात्र उमेदवारांमध्ये एम ए बी एड, एम एस सी ,बी ए बीपी  एड असे उच्चशिक्षित तरुण सदर पदासाठी अर्ज केल्यामुळे निवड प्रक्रियेत निवड करीत असताना गावकऱ्यामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.

ग्राम रोजगार सेवक या पदाची निवड ग्रामपंचायत द्वारे ग्रामसभा घेऊन प्रत्यक्ष करण्यात येणार असून सदर निवडीचे अधिकार हे ग्रामसभेसाठी दिलेले आहेत.

ग्रामसभेमधून कोणाची निवड होते हे पाहण्यासाठी गावकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून सदर प्रक्रियेची चर्चा मात्र रंगली आहे .

निवड प्रक्रियेमध्ये मध्ये लगाबजी, वशिला वगैरे काहीही चालणार नसल्याने जे पात्र उमेदवार आहेत त्यामधुनच ग्रामसभेमधून ग्रामसभेमध्ये पारदर्शकपणे निवड केली जाईल ग्रामपंचायत अधिकारी संदीप मोरे यांनी सांगितले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button