मारहाण केल्या प्रकरणी आठ जनाला तिन वर्षे कारावास व चार लाख रुपये दंड… उमरी न्यायालयात न्यायाधीशांनी दिला निकाल..
आमचा न्यायदेवता वर विश्वास होता म्हणून सत्याचा विजय होत माझ्या भावंडांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया उमरी नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अनिल सोनकांबळे यांनी व्यक्त केली.

उमरी प्रतिनिधी
उमरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे प्रथम वर्ग न्यायाधिकारी ए बी रेडकर यांनी तारीख 07डिंसेंबर रोजी खुल्या न्यायालयात आर .सी.सी.नं.77/2015 भा. द.वि.कलम143,147,148,324,323,149भा.द.वि.सर्व कलमा
अन्वे अदि आठ आरोपींना तिन वर्षाची सजा.फिर्यादिना नुकसानपोटी तिनं लक्ष विसहजार रुपये व सरकारला ऐंशी हजार रुपये दंड ठोठावला आहे.
जुन्या गावातील दि.08.09.2014 रोजी भगवान संतराम सोनकांबळे, अन्य तीन जनाना आरोपी यांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन मारहाण करण्यात आली होती.फिर्यादी यांच्या तक्रारीवरून उमरी पोलिस स्टेशनला गुणा
दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणातील एक आरोपी मयत झाला असून आठ आरोपींने फिर्यादीस मारहाण करण्यात आले होते त्या प्रकरणी फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाब घेण्यात आल्या होत्या यावरून आरोपी साईनाथ बोईनवाड,देविदास गुंडेवाड, दत्ता माळवदकर,कालीदास गुंडेवाड, लक्ष्मण ईरलेवाड, छगन हिवराळे, महेश पडोळे, , महेश हेमके,
आदिना तिन वर्षे कारावास व चार लाख रुपये दंड उमरी चे न्यायाधीश ए बी रेडकर यांनी निकाल दिला फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील अजीम खाण व आर बी जाधव यांनी कामं केली तर आरोपी यांच्या बाजूने एम डी मेहता यांनी काम केले.
आमचा न्यायदेवता वर विश्वास होता म्हणून सत्याचा विजय होत माझ्या भावंडांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया
उमरी नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अनिल सोनकांबळे यांनी व्यक्त केली.



