Latest Newsनांदेडनायगांव

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला इंडियन गॅस एजन्सीची केराची टोपली !  तळपत्या उन्हात ग्राहकांच्या रांगा; घरपोच सेवा बंदच, प्रशासन मात्र गप्प

रघुनाथ सोनकांबळे……

नांदेड जिल्ह्यात गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी गॅस एजन्सी चालक व सेल्स ऑफिसर्स यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत ग्राहकांना गॅस सिलिंडर केवळ घरपोच पद्धतीने देण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले होते. एजन्सीवर गर्दी होऊ नये, ग्राहकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागू नये आणि वितरणात पारदर्शकता राहावी, यासाठी कडक निर्देश जारी करण्यात आले होते.
Screenshot 20260329 195507 Google
Screenshot 20260329 195507 Google
मात्र नायगाव येथील इंडियन गॅस एजन्सीकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच सरळ केराची टोपली दाखवली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. घरपोच गॅस वितरण बंधनकारक असताना देखील एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्राहक तळपत्या उन्हात तासन्तास उभे राहत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे अनेक ग्राहकांनी बुकिंग करूनही वेळेवर घरपोच गॅस मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “घरपोच सेवा देण्याचे आदेश असताना आम्हालाच सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीवर बोलावले जाते. तासन्तास रांगेत उभे राहूनही सिलिंडर वेळेवर मिळत नाही,” अशी नाराजी ग्राहकांनी व्यक्त केली.
20260511 115716
20260511 115716
जिल्हाधिकारी बैठकीत स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, कोणत्याही परिस्थितीत एजन्सीवर थेट सिलिंडर वाटप करू नये. ग्राहकांना अडचण आल्यास संबंधित तालुका पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही निर्देश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या आदेशांची खुलेआम पायमल्ली होत असल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
20260511 115714
20260511 115714दरम्यान, संबंधित पुरवठा विभाग आणि प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन इंडियन गॅस एजन्सीवर कठोर कारवाई करावी, तसेच ग्राहकांना नियमाप्रमाणे सरळ घरपोच गॅस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button