Latest Newsनांदेडनायगांव
धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या समर्थनात नायगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर शेळ्या मेंढ्यांचे अनोखे एक दिवसीय धरणे आंदोलन ……

रघुनाथ सोनकांबळे नायगाव ….
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी 17 सप्टेंबर 2025 पासून जालना येथे आमरण उपोषनास बसले आहेत. त्यांच्या समर्थनात आज नायगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय नायगाव येथे करण्यात आले आहे. सदर आंदोलनात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी चक्क तहसील कार्यालयात शेकडो शेळ्या मेंढ्या आणून धरणे आंदोलनात सहभाग नोंदवला. या एक दिवसीय धरणे आंदोलनात प्रमुख मागणी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गाचा अध्यादेश शासनाने तात्काळ काढावा आणि तसे प्रमाणपत्र देण्यात यावे.




