Latest Newsनांदेडनायगांव

दहा ब्रास गिट्टी चोरी प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; कुंटूर पोलिसांच्या हद्दीत जातिवाचक शिवीगाळचा गंभीर प्रकार.. आरोपी मात्र मोकाटच…

 

रघुनाथ सोनकांबळे
नायगाव..

कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे सुजलेगाव येथे घडलेल्या एका गंभीर प्रकरणात शेतातील दहा ब्रास दगड-गिट्टी चोरी आणि त्यानंतर जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप करत संबंधित आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य असूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
Img 1767500767567
Img 1767500767567

 

फिर्यादी सुभाष गंगाराम नव्हारे रा. सुजलेगाव ता. नायगाव यांच्या शेतातील दगड-गिट्टी चोरून नेल्याने चौकशीसाठी गेलेल्या शेतमालक सुभाष नव्हारे यास सुधाकर तुकाराम बकवाड, बजरंग उर्फ राजू भीमराव मुकदम, रामदास ईरना कोचमवाड, जळबा भाऊराव कदम सर्व राहणार सुजलेगाव यांनी जातिवाचक शब्दांत शिवीगाळ केली, धमकावले व मानसिक त्रास दिल्याचा आरोप नव्हारे यांनी केला आहे.
हा प्रकार केवळ चोरीपुरता मर्यादित नसून, सामाजिक सलोख्याला धक्का देणारा व कायद्याची थेट अवहेलना करणारा असल्याचे स्पष्ट होत आहे.
या घटनेप्रकरणी सुभाष नव्हारे यांनी काल दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी रीतसर तक्रार दिल्याने कुंटूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम बि.एन.एस. 303, 2 96, 115 (2), 352, 351 ( 2), 3(5), 3(1) आर, 3(1 )एस ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत वेगवेगळ्या गंभीर कलमान्वये वरील चारही आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून कुंटूर पोलीस या घटनेचा तपास करीत असून अद्याप तरी आरोपी मात्र मोकाटच असल्याचे कळाले आहे.
कायद्यानुसार हा गंभीर व अजामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा असतानाही आरोपीस अटक न झाल्याने पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे, ॲट्रॉसिटी कायद्याचा उद्देश पीडितांना तातडीचा न्याय व संरक्षण देणे हा असताना, कारवाईतील दिरंगाईमुळे पीडित वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
आरोपींवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी ‘कायद्याचा धाक नेमका कुणासाठी?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button