Latest Newsआपला जिल्हाउमरीनांदेड

शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई तात्काळ द्या.,….मारोतराव कवळे 

उमरी प्रतिनिधी…

उमरी तालुक्यात सतत 8 ते 10 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे  उन्हाळी हंगामातील ज्वारी, भुईमूग, टरबूज, आंबा, केळी ,इत्यादी फळ पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तरी झालेल्या पिकाचे व घराचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. तरी शेतकऱ्यांना तात्काळ संबंधित विभागामार्फत शेतातील नुकसान झालेल्या पिकाचे व घरांचे तात्काळ पंचनामे करून शेतक-यांना आर्थिक मदत तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन आज कवळे गुरुजी यांनी उमरी तहसीलदारांना दिले आहे.

Img 20250527 Wa0033
Img 20250527 Wa0033

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button