Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली

लोहगाव सर्कलमध्ये श्रावण भिलवंडेंचा झंझावात ‘जनसंवाद’ मोहिमेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद — भाजपचा झेंडा फडकणार याचे स्पष्ट संकेत!

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव…

 

 बिलोली..आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय समीकरणांना वेग आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या सर्कलमधून भाजप नेते श्रावण पाटील भिलवंडे यांनी उमेदवारीची मागणी जाहीर करताच, त्यांनी हाती घेतलेल्या ‘जनसंवाद अभियानाला’ अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
Img 20251113 Wa0010
Img 20251113 Wa0010
गावोगावांत नागरिकांशी थेट संवाद साधत भिलवंडे हे “आता विकासपर्व — सोबत आपण सर्व” हा संदेश देत आहेत. प्रत्येक गावात त्यांच्या सभांना नागरिकांची गर्दी उसळत असून, “अशाच दमदार नेतृत्वाची आम्हाला गरज आहे” अशा प्रतिक्रिया मतदारवर्गातून उमटत आहेत.
भाजपच्या विकास कार्यांचा आढावा, स्थानिक प्रश्नांवरील थेट भूमिका आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला संवाद या माध्यमातून भिलवंडे यांनी जनमानसात ठसा उमटवला आहे. लोहगाव, तळणी, पाचपिंपळी, जिगळा, डोणगाव (खु), डोणगाव (बु), अंजनी, कासराळी, भौसी, सावळी, दगडापूर, बेळकोणी, चिंचाळा, रुद्रापुर आदी गावांत भिलवंडेंच्या जनसंवाद यात्रेने वातावरण तापले आहे.
Img 20251113 Wa0009
Img 20251113 Wa0009
भिलवंडेंची “सहज उपलब्ध, निडर आणि तळागाळाशी घट्ट नाळ असलेला नेता” अशी ओळख या सर्कलमधील मतदारांमध्ये मजबूत होत चालली आहे. नरसी परिसराशी दैनंदिन संपर्क असलेल्या या भागातील नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या जनसंवाद यात्रेत माजी जि.प. सदस्य संग्राम पाटील हायगले, महेश पाटील हांडे, आनंदराव पाटील बावणे, बाबुराव चरकुलवार, मारीतराव वडगावे, गंगाधर बिगेवार, इरवंत सोमशेटवार, मारोती सायना पाटील, राजेश्वर काप्रतवार, बंटी माचलोड, राजू वडगावे, आनंदराव हाळे, गंगाधर नुच्चे, विजय पैसके, दयानंद गायकवाड, गणपत देवाले, ज्ञानेसर इंद्रासे, विकास गुरूदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग होता.
लोहगाव सर्कलमधील मतदारांकडून होत असलेल्या भिलवंडेंच्या उमेदवारीसाठीच्या एकमुखी मागणीने, या सर्कलमध्ये येत्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार हे संकेत अधिकच स्पष्ट झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button