Latest Newsआपला जिल्हानांदेड
नव्या एसपींचा दणका; कर्तव्यात गैरवर्तन करणारे उमरी पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित. शिस्तभंगाविरोधात कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश..

रघुनाथ सोनकांबळे….
नांदेड जिल्हा पोलीस दलात शिस्त आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत पोलीस अधीक्षकांनी कर्तव्यात गैरवर्तन करणाऱ्या उमरी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. या निर्णयामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून शिस्तभंग करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने मंगळवारी (दि. ३० जून) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पोलीस हवालदार सुनील गोपाळराव कोलबुडे (बकल क्रमांक ६८०) आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महमद आवेज महमद मोईज (बकल क्रमांक ३१२२) यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
दि. २३ जून २०२६ रोजी उमरी ते धर्माबाद मार्गावर शासकीय दुचाकीवर कर्तव्य बजावत असताना संबंधित कर्मचाऱ्यांचे वर्तन गंभीर, गैरशिस्तीचे व आक्षेपार्ह असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.
या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे मानून मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ तसेच महाराष्ट्र पोलीस (शिस्त व अपील) नियम, १९५६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.



