Latest Newsआपला जिल्हानांदेडहिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथे वीज पडून वासरू ठार..
वासरासह गट क्र. 212 शिवारात सेडवर विज पडून शेती साहित्य जळून खाक..

हिमायतनगर प्रतिनिधी..
हिमायतनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील शुक्रवारी (ता.26) सायंकाळी मुसळधार पावसात वीज शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर कोसळल्याने बोरगडी येथील शेतकरी प्रभाकर संभाजी भाकरे यांच्या शेती गट क्रमांक 212 वर कोसळल्याने या दुर्दैवी घटनेत वासरू मृत्यू झाले आहे तर दुसरीकडे शेती साहित्य मोटर, खत, पाईप पिकलर पुर्णपणे जळून खाक झालेल्याने शेतकरी अडचणीत सापडला असुन या घटनेमुळे बोरगडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




