नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गडगाव ते कवठा रोडवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून नायगाव पोलीस घटनास्थळी पोहोचून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे..
Img 20251002 Wa0012
नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गडगा ते कवठा रोडवर एक आनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला असून तो अंदाजे 25 ते 30 वर्ष वय ,अंगावरील कपडे ब्लॅक पॅन्ट फिकट हिरव्या रंगाचा शर्ट वर्ण गोरा ते गव्हाळ उंची अंदाजे साडेपाच फूट मध्यम बांधा वर्णनाचा मृतदेह असून घटनास्थळी नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मार्कड व पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांचे सहकारी पोहोचले असून मर्तकाचा व त्याच्या नातेवाईकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कळाले असून जर कोणास यासंबंधी माहिती मिळाल्यास नायगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. माहिती मिल्यास संपर्क करावा