आपला जिल्हानांदेडमहाराष्ट्र

देशात सात दिवसाचा दुःखवटा केंद्र सरकारने जाहीर केल्यामुळे नियोजित नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा पुढे ढकलण्याची भिमशक्तीची मागणी..

नांदेड प्रतिनिधी..दि.(.२७)  .. भारत देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे आज दुःखद निधन झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या वतीने देशात सात दिवसाचा दुःखवता जाहीर केला असून केंद्र सरकारचे पूर्वनियोजित कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत.

त्याच अनुषंगाने भीमशक्तीच्या वतीने आज  खा. प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण  व जिल्हाधिकारी नांदेड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांना एक निवेदन देऊन नांदेड जिल्ह्यात होणारी पूर्वनियोजित माळेगाव येथील यात्रा व यात्रेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून या दुःखवट्यात सहभाग नोंदवावा असे निवेदन भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ सोनकांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button