Latest Newsआपला जिल्हानांदेडमुखेड
वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते सुजात आंबेडकर मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त भागाची करणार पाहणी…

रघुनाथ सोनकांबळे नायगाव….
पूरग्रस्त गावे हसनाळ प.मु.व रावणगाव येथील नागरिकांशी साधणार संवाद
मुखेड….
वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर हे नांदेड शहरातील व जिल्ह्यातील विविध भागांसह मुखेड तालुक्यामध्ये पूरग्रस्त गावे मौजे हसणाळ प.मु.व रावणगाव ह्या गावातील पुरपरस्थीची माहिती,तेथील नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बुधवार दि.1 ऑक्टोंबर 2025 रोजी दौऱ्यावर येत आहेत.
राज्यातील विविध भागासह नांदेड शहरासह जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात पहिली अतिवृष्टी पूर दि.१५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसामुळे तालुक्यातील लेंडी प्रधान प्रकल्प पूर्णतः भरुन जावून भागातील मौजे हसनाळ प.मु व रावणगाव सह आजूबाजूच्या अनेक गावात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली त्याचबरोबर पशुधनाची ही मोठ्या संख्येने जीवितहानी झाली. त्यानंतर पुन्हा दि.२६ व २७,सप्टेंबर रोजी तालुक्यात सर्वत्र संततधार पावसाने कहर माजविला आहे.या अतिवृष्टी पाऊसाने तालुक्यात पुन्हा एकदा हाहाकार माजविला असल्याने शेतातील उरली सुरली पिके ही पाण्याखाली जावून जमीनदोस्त झाली आहेत. या मुसळधार पावसात तालुक्यातील विविध ठिकाणच्या पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुरात वाहून जाऊन तालुक्यातील ३५ शेळ्या,५ मेंढ्या,१ म्हैस तर १ बैल वीज पडून दगावल्याची घटना घडली आहे. अतिवृष्टी पाऊसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले असून मुखेड- नरसी – नांदेड राज्य मार्गावरील रातोळी येथील पुलाला अतिवृष्टी पाण्यामुळे भेगा पडल्या असून पुल दोन ते तीन ठिकाणी ढासळला असल्याने मुखेड तहसिल कार्यलय प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
जिल्ह्यासह मुखेड तालुक्यातील विविध ठिकाणी शेळ्या,मेंढ्या, हलगट,म्हैस,बैल पुरात वाहून गेलेल्या भागात व अनेक गावात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असल्याने त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन त्या नुकसान ग्रस्त व पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या विविध समस्या त्यांची मते जाणून घेण्यासाठी व त्यांना सरकारकडून तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्याच्या उद्दिष्टाने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर हे आज मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त भागाचे पाहणी करण्यासाठी आले आहेत.



