Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नरसी तालुका नायगाव येथील ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण तात्काळ काढा…. यादव सोनकांबळे..

. रघुनाथ सोनकांबळे.दि.(१०).

 

नरसी तालुका नायगाव येथील ग्रामपंचायत शासकीय जमीन गट क्रमांक 222, 223 वरील अतिक्रमणित जागेवरील बांधकाम तात्काळ काढण्यासाठी तहसील कार्यालय नायगाव येथे देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते यादव धोंडीबा सोनकांबळे हे आमरण उपोषणास बसले आहेत.
सविस्तर माहिती अशी की…… नायगाव तालुक्यातील मौजे नरसी येथील ग्रामपंचायत शासकीय गट क्रमांक 222, 223 या जागेवर सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगणमताने सदर जागेवर टोलेजंग इमारती बांधून त्या भाड्याने देण्यात आल्या आहेत. इमारतीचे भाडे ते स्वतः घेत असल्याने सदर जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे याकरिता देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते यादव सोनकांबळे यांनी 2021 पासून ते आज पर्यंत त्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी लढा देत आहेत…
त्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नादेड, तहसीलदार नायगाव, गटविकास अधिकारी प.स.नायगाव या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरसी येथील ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना वेळोवेळी कार्यवाही करण्याचे आदेश देऊ नही नरसी येथील निबर गट्ट सरपंच व ग्रामसेवक यांनी सदर वरिष्ठाचे आदेश न जुमानता त्या आदेशाला केराच्या टोपलीत टाकल्याचा आरोप यादव सोनकांबळे यांनी आपल्या निवेदनात केला आहे.सन 2011 पासून ते आज पर्यंत हा प्रश्न निकाली न लागल्याने त्यांनी आज दिनांक 10 3 2025 रोजी पासून तहसील कार्यालय नायगाव या ठिकाणी बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड ,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नादेड तहसीलदार नायगाव गटविकास अधिकारी प.स.नायगाव यांना देऊन उपोषणास सुरुवात केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button