Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

विरोधी पक्ष नते राहुल गांधी यांनी  सुरू केलेले देशव्यापी जनआंदोलन ओट चोर जनजागृती स्वाक्षरी मोहीमेला नायगावात स्वाक्षरी मोहीम राबवून दिला काँग्रेसने पाठिंबा

रघुनाथ सोनकांबळे ….

 

 नायगाव बा….    भारतीय निवडणूक आयोगास हाताशी घालत देशाच्या जनतेचे मतदान चोरी करून असंविधानिक रित्या स्थापन झालेल्या मोदी सरकारचे मतचोरी प्रकरण भारतीय संसदेचे प्रखर विरोधीपक्ष नेते राहुलजी गांधी यांनी पुराव्यासह देशासमोर आणले.
या प्रकरणांमुळे बाधित झालेल्या देशाच्या पवित्र संविधानाच्या रक्षणार्थ राहुलजींनी जन आंदोलन उभे केले, या देशव्यापी आंदोलनास पाठिंबा म्हणून आज पासून काँग्रेस तर्फे नायगावात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

 

या स्वाक्षरी मोहीमेत  खा.रविंद्र पाटील चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आ.हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, एन.एस.यु.आय प्रदेश प्रभारी तथा ए.आय.सी.सी.सदस्य अक्षय यादवजी, प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भिलवंडे , श्रीनिवास पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, नगराध्यक्ष प्रतीनिधी संजय पाटील चव्हाण, जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे आशोकराव पवळे, मा.सभापती सय्यद रहीम, एन.एस.यु.आयचे जिल्हाध्यक्ष युवा सहकारी सुरज शिंदे, जेष्ठ सहकारी मोहनराव धुप्पेकर, रविंद्रजी भालेराव, तालुकाध्यक्ष माणिक चव्हाण, किरण कदम, अनिल पवळे,विठ्ठल बेळगे आणि बहुसंख्येत उपस्थितीत असलेल्या जेष्ठ व तरूण सहकाऱ्यांनी स्वाक्षरीसह सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button