Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

बोगस कर्मचाऱ्याचा आठ वर्षांचा ‘सप्लाय’ खेळ उघड! IAS अनन्या रेड्डींचा तहसील कार्यालयात धडक निर्णय; महसूल विभागावर संगनमताचे सावट..

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव..

नायगाव येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात तब्बल आठ वर्षांपासून बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या यश सोनकांबळे या कथित ‘बोगस कर्मचाऱ्याला’ अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नुकत्याच रुजू झालेल्या IAS अनन्या रेड्डी यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत संबंधित व्यक्तीला तहसील कार्यालयातून हद्दपार केले आहे.
शिवसेना पदाधिकारी गजानन पाटील तमलुरे यांनी तहसील कार्यालयात भेट देऊन पुरवठा विभागात बोगस पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीबाबत ठोस तक्रार सादर केली. त्यानंतर रेड्डी यांनी कोणतीही दिरंगाई न करता संबंधिताला तत्काळ हटवण्याचे आदेश दिले. तसेच भविष्यात तो व्यक्ती कार्यालयात काम करताना आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
Img 20260304 Wa0041
Img 20260304 Wa0041

तीन महिन्यांची नियुक्ती… आणि आठ वर्षांचा ‘राज’?

मिळालेल्या माहितीनुसार, यश सोनकांबळे याची सुमारे आठ वर्षांपूर्वी केवळ तीन महिन्यांसाठी ई-मशीन ऑपरेटर म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोणतेही नियुक्तीपत्र नूतनीकरण न करता तो आजपर्यंत पुरवठा विभागात कार्यरत होता. नवीन रेशन कार्ड तयार करणे, दुरुस्ती करणे अशा महत्त्वाच्या शासकीय सेवा तो पार पाडत होता.
धक्कादायक बाब म्हणजे, या काळात त्याने प्रत्येक रेशन कार्ड दुरुस्तीसाठी लाच मागितल्याच्या तक्रारी जनतेतून पुढे आल्या आहेत. तरीही महसूल विभागातील संबंधित अधिकारी, तसेच रजेवर असलेल्या तहसीलदार यांनी याकडे डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.

‘दराडे मॅडम’च्या छत्रछायेखाली कारभार?

पुरवठा विभागातील दराडे मॅडम यांच्या छत्रछायेखाली हा संपूर्ण प्रकार सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे अधिकृत नियुक्तीपत्रच नसेल, तर तो संवेदनशील शासकीय कागदपत्रांवर काम कसे करू शकतो? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

महसूल विभागाचे संगनमत?

तत्कालीन आणि रजेवर असलेल्या तहसीलदार, तसेच संबंधित अधिकारी यांच्या संगनमताशिवाय असा प्रकार आठ वर्षे सुरू राहू शकत नाही, असा गंभीर आरोप होत आहे. जर ही बाब खरी असेल, त हा केवळ एका व्यक्तीचा गैरप्रकार नसून संपूर्ण नायगाव महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा घोटाळा ठरतो..
नायगाव तहसील कार्यालयातील हा प्रकार केवळ एका बोगस कर्मचाऱ्याला हटवण्यापुरता मर्यादित न राहता, महसूल विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींचा पर्दाफाश करणारा ठरेल का, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button