राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नांदेड कंत्राटी कर्मचारी यांचे पुनर्नियुक्ती प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्यांची तक्रार उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्याकडे भीमशक्तीच्या वतीने करण्यात आली आहे

. नांदेड प्रतिनिधी..दि..(२७)… नांदेड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य विभागाच्या आरोग्य राष्ट्रीय अभियानामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अनियमितते बाबत संबंधितावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले असता संबंधित अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची चौकशी न करताच थातूरमातूर उत्तरे देऊन प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केला..
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांची कंत्राटी नियुक्ती 30 जून 2024 रोजी संपलेली असताना सण २०२३ ,२४ चे कार्य मूल्यांकनाआधारे नियमाने १ जुलैचा खंड देऊन पुढील पुनर्नियुक्ती देणे आवश्यक होते. परंतु असे न करता संबंधितांनी कोणत्याही आदेशाशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केलेले आहे ही सर्वात गंभीर बाब आहे.
. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शेख जुनेद व चौधरी जिल्हा लेखा व्यवस्थापक हे कंत्राटी कर्मचारी व स्वतःचेही वेतन नियमित काढत आहेत. याबाबत संबंधितांची चौकशी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दि.२८/१०/२०२४ रोजी तक्रार करण्यात आली होती पण त्या तक्रारीची दखल न घेता काहीतरी द्यावे म्हणून उत्तरे लेखी देऊन प्रकरण रफादफा करण्याचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे त्यात दिलेल्या टपाली पत्रातून कळाले.

सदर प्रकरणात खोलवर चौकशी केली असता नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती 29/ 6/ 2024 रोजी संपुष्टात आली .कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे सन 2023 ,24 चे कार्यमूल्यांकन अहवाला आधारे त्या कालावधीत कार्यरत असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्य मूल्यांकन अहवाला आधारित पुनर्नियुक्ती देणे क्रमप्राप्त होते.
परंतु तसे न करता सध्या पदावर असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख ह्या दिनांक 15 /7/ 2024 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड या पदावर रुजू झालेले असताना त्यांनी कंत्राटी कर्मचारी यांचे सन 2023 ,24 चे कार्य मूल्यांकन करणे हे पूर्णतः गैरव बेकायदेशीर आहे. 2023 ,24 मध्ये डॉ. संगीता देशमुख या जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या पदावर कार्यरत नसताना कंत्राटी कर्मचारी यांचे पुनर्नियुक्ती प्रस्तावावर कार्य मूल्यांकन करून जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जुनेद व चौधरी जिल्हा लेखा व्यवस्थापक यांनी सर्व संघांमध्ये चुकीची व नियमबाह्य संचिका सादर करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे.
सदर प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने व ते स्वतः सदर प्रकरणात संगणमत करून असल्याने संबंधित सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांनी करून तात्काळ दोषींना पदावरून निलंबित करावे.
अशी मागणी भीमशक्तीच्या वतीने भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ सोनकांबळे यांनी केली आहे .सदर तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड ,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड ,व सर्व संबंधितांना दिले आहेत .जर सदर प्रकरणाची चौकशी होऊन दोषीवर निलंबनाची कारवाई न झाल्यास सदर मागणीसाठी योग्य न्याय मिळण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



