Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. लोहगावे

नरसी फाटा…

धर्म, सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन नांदेड शहरात करण्यात आले आहे. हा भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक शहीदी समागम दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे होणार आहे.
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली तसेच समस्त शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या शहीदी समागमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून देत सर्वधर्म समभाव, मानवता आणि सत्याचा संदेश समाजात अधिक दृढ करण्याचा उद्देश आहे.
या दोन दिवसीय शहीदी समागमात विविध धार्मिक विधी, श्रद्धांजली कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यासह देशातील विविध भागांतून भाविक, धर्मप्रेमी नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहरात भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण होणार आहे.
या ऐतिहासिक व गौरवशाली कार्यक्रमास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस (नांदेड दक्षिण) माणिकराव लोहगावे यांनी केले आहे. “आपली उपस्थिती हीच श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना खरे अभिवादन ठरेल,” असेही त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button