Latest Newsआपला जिल्हानांदेड

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त नांदेडमध्ये सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा ..

रघुनाथ सोनकांबळे….

नांदेड .. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त आयोजित समता दिंडीला आ. अमर राजूरकर, बालाजीराव कल्याणकर, आनंदरावजी बोंढारकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समता दिंडीत विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यानंतर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमात नशामुक्तीची शपथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना धनादेश वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जमीन वाटप आदेश,तसेच मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ वितरित करण्यात आला.सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, शिक्षण व आरक्षण विषयक कार्याचा गौरव करत समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये जोपासण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन नरवाडे यांनी केले, सूत्रसंचालन अंजली नरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन एल. एस. गायके यांनी केले. कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button