धर्माबाद प्रतिनिधी दि.(२५)
धर्माबाद – नंदी ज्याचा अर्थ “आनंद देणे” किंवा “आनंद देणे” हा हिंदू देव शिवाचा पवित्र नंदी आहे, जो सर्वात महत्वाच्या हिंदू देवतांपैकी एक आहे. जेव्हा जग दुष्ट बनते, तेव्हा फायदेशीर बदल घडवून आणण्यासाठी शिव त्याचा नाश करतो. नंदी हे शिवाचे प्राणी स्वरूप, त्याचे वाहतुकीचे साधन आणि त्याचा सर्वात उत्कट उपासक आहे.पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव अमरनाथ गुहेत माता पार्वतीला अमरत्वाची कथा सांगण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी नंदी, वासुकी, चंद्र, गणेश आणि पाच तत्वांचा त्याग केला होता. पार्वतीजींनी अमरत्वाची कथा ऐकली तेव्हा तेथे कोणीही नसावे अशी त्यांची इच्छा होते.
नंदीचा परिचय नंदी हा पवित्र बैल आहे, जो नाशाचा देव भगवान शिव यांचे वाहन किंवा आरोह म्हणून काम करतो. तो मुख्य शिव गणांपैकी एक म्हणून देखील राहतो, परमेश्वराचे दैवी सेवक आणि शिवाचे पर्वतीय निवासस्थान असलेल्या कैलासचे प्रमुख संरक्षक देखील आहेत. त्याला धार्मिक क्षेत्रात उच्च दर्जा आहे आणि त्याला नंदी देवा किंवा नंदिकेश्वर म्हणून आदराने संबोधले जाते.
शिखर शिंगणापूर मोठा महादेव येथुन विद्या प्राप्त केली आसुन यादव परिवारातील पहिले भिकाजी जमनाजी यादव, गंगाराम यादव,आर्जुन यादव हि तिसरी पिढी काम पाहत आसुन
अशातच बुधवारी रोजी सकाळी बीड जिल्ह्यातील कडाष्ठी यादव परिवारतला गोकुळ नावाचा नंदी आकरा वर्षाचा चार ते पाच जनांचा संचा सोबत बल्यापहाटे धर्माबाद च्या पावनभीमुत दाखल झाला आसुन महिलांनी मोठ्या उत्साहाने नंदी ची विधीवत पूजा अर्चणा केली.ज्यांना जे घडेल ते नंदीच्या व यादव परिवाराच्या उपजिवेके साठी लोकांनी दक्षिणा दिली.
नंदी याला आपल्या बोली भाषेत जे विचारले तो बरोबर उत्तर देतो.
तो आता तिसऱ्या पिढीतल शेवटचा नंदी (गोकुळ )आमच्या व्यवसाया साठी राहनार आसुन या नंतरची पिढी आमच्या यादव परिवार साठी राहणार नाही आशी खंत आर्जुन यादव यांनी उपोरोक्त प्रतिनिधीशी बोलताना दिली.
यादव परिवारातील तिस-या पिढीतील मुलांना या व्यवसायात पासून दुर ठेवुन उच्च शिक्षणाचे धडे देवुन आज यांचे मुल उच्च शिक्षण घेत असुन यापुढील यादव परिवारातील नंदी गोकुळ व्यवसायासाठी अशिक्षित मुलं मुली नसणारा असल्यामुळे ही आमची कदाचित या व्यवसायातील शेवटची पिढी असेल अशी खंत या परिवारातील वयस्कर सदस्यांनी बोलून दाखवली.या नंदी (गोकुळ) च्या संचा सोबत तानाजी यादव, आर्जुन यादव, कृष्णा गोडे,अमृत यादव आदिंचा समावेश होता.



