Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली

सध्याची पूर परिस्थिती लक्षात घेता आज विभागातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याच्या सूचना विभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिले .

रघुनाथ सोनकांबळे….

बिलोली आणि नायगांव तालुक्यामधील सध्याची पूर परिस्थिती लक्षात घेता दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावचा संपर्क तुटला आहे काही ठिकाणी पुरामुळे रस्ते खचले असून पूल देखील वाहून गेल्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत तसेच अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी सखल भागात असलेल्या शाळांमध्ये देखील पाणी साचलेले आहे.
सदरील बाबी लक्षात घेता बिलोली आणि नायगांव तालुक्यामधील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना दिनांक 29/8/2025 रोजी एक दिवस सुट्टी घोषित केले आहेत. असा आदेश आल्याने विभागातील संबंधित शाळा कॉलेज प्रमुखांनी विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाची सुट्टी घोषित करून पुढील आदेश येईपर्यंत सर्व संबंधित शाळांच्या सूचनांकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असे सर्व शाळां , कॉलेज प्रमुखाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button