सीसीआयच्या जाचक अटी कमी कराव्यात – कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

धर्माबाद प्रतिनिधी..दि.१९
धर्माबाद – प्रतिकूल हवामान परिस्थितीत शेतकरी कापूस उत्पादन घेत आहे. धर्माबाद तालुक्यात बऱ्याचशा भागात कापूस उत्पादन घेणे बंद केले आहे.
ज्या भागात पिकवला जातो त्या शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ११००० रुपये आवश्यक असताना सध्या खाजगी बाजारात ७००० पेक्षा कमी दर मिळत आहे.
सरकारने हमीभाव खरेदीसाठी सीसीआय केंद्र सुरू केले असून ही केंद्रे असून अडचण नसून खोळंबा झालेली आहेत. कापसातील ओलावा १२% पेक्षा अधिक असेल तर शेतकऱ्यांच्या कापसाला सीसीआय कडे विकता येत नाही.
त्यासोबत धाग्याच्या लांबी अनुषंगाने हमीभाव ७५२१ असताना देखील धर्माबाद मध्ये मात्र ७४२१ रुपये देण्यात येत आहे. या दोन्ही अटीमुळे शेतकऱ्यांना इच्छा नसताना आपला कापूस सीसीआय ऐवजी खाजगी व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे.
. यात शेतकऱ्याचे प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांचे नुकसान होत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट तयार होत आहे. विद्यमान महायुती सरकारमधील अनेक लोकप्रतिनिधींनी निवडणूक काळात कापूस व सोयाबीन प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले होते .या आश्वासनाचा विसर या लोकप्रतिनिधींनी पडून न देता शेतकऱ्यांना या जाचक अटीतून वाचवावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.



