कुंटूर येथील ग्रामसभेने बालविवाह व प्लास्टिक बंदी सह तंबाखूमुक्त गाव करण्याचा घेतला निर्धार

कुंटूर प्रतिनिधी..दि(२९)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील ग्रामसभा 27/ 1 2025 रोजी घेण्यात आली ह्या ग्रामसभेमध्ये वरिष्ठ पातळीवरून आलेले माहितीपत्रक वाचून दाखवताना गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या वर कारवाईक होणार असून बालविवाह केलेल्या आई-वडिलावर सुद्धा कारवाई करण्यात येईल व प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा असा निर्धार कुंटूर येथील ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला.

. यावेळी ग्राम पदाधिकारी नागेश येडसंवार यांनी सदर गावातील सरपंच सदस्य व गावातील सर्व नागरिकांना बालविवाह करू नका तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका व प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तूचे देवाण-घेवाण व विक्री तसेच प्लास्टिक मुक्त गाव करणार असल्याचा शपथ व घेण्यात आले.
यावेळेस शपथ ग्रामविकास पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना अशी शपथ दिले की यापुढे मी गावात तंबाखू चे सेवन करणार नाही व सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करून थुंकणार नाही याचबरोबर बालविवाह गावामध्ये होऊ देणार नाही व झालाच तर सदर माहिती शासनाला कळविन त्याचबरोबर प्लास्टिकचे कोणतेही उत्पादन हे बंदी करणार व उत्पादन होऊ देणार नाही व प्लास्टिक मुळे होणारे दुष्परिणाम आम्हा सर्वांना माहीत असून प्लास्टिक बंद करणार असल्याचा निर्धार व शपथ ग्रावातील सर्व नागरिकांना ग्रामसभेमध्ये ग्राम पदाधिकारी नागेश यडसंनवार यांनी दिले.
यावेळी सरपंच महिला आशाताई कदम , ग्रामपंचायत सदस्य चेअरमन रुपेश देशमुख कुंटूरकर सदस्य ग्रामपंचायत , सदस्य सुधाकर झुंजारे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी कल्यापुरे, दत्ता नालिकटे या गावातील सर्व नागरिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता अफरोज चौधरी व सर्व नागरिक उपस्थित होते.



