रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहगाव या शहरात एका बारतोंडीच्या झाडाला मसलगा तालुका कंधार येथील तरुण विश्वनाथ गोविंद सूर्यवंशी वय 19 वर्ष या तरुणाने लोहगाव परिसरातील नरसी बिलोली या हायवे रस्त्याच्या बाजूला लोहगाव शिवारात बारतोंडीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 13 रोजी दुपारी घडल्याचे उघडकीस आली आहे.
हा तरुण अविवाहित असून खैरगाव येथील त्यांच्या बहिणीकडे राहत असल्याची माहिती पोलिसांकडून कळाली असून सदर घटनेची माहिती विश्वनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांना देण्यात आली असून नातेवाईक आल्यानंतरच सदर तरुणांनी आत्महत्या का केली असावी हे कारण स्पष्ट होईल असे रामतीर्थ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.