तालुक्यातील नरसी येथील ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्योती इंग्लिश मीडियम स्कूल चे अध्यक्ष तथा माजी सभापती सय्यद रहीम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीधर जगताप, सरपंच गजानन भिलवंडे, पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, बाबुराव पाटील शिंदे होटाळकर, पत्रकार गंगाधर भिलवंडे, गोविंद टोकलवाड, गंगाधर गंगासागरे, होटलपा अप्पा, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या गीतांने झाली यावेळी पारंपारिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका लोकगीते यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी गावातील महिला , पुरुष, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सय्यद एम.आर., ईंगोले जि.यु, बंडगर एस.जी, चिखले एस.एन., कदम टि.जी., मुंडकर संभाजी , जावेद सर, कल्याणकर सर शेख अफरोज ,चव्हाण मॅडम या शिक्षकांनी परिश्रम घेतले.