Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
अनु.जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेशोत्सव साजरा..

रघुनाथ सोनकांबळे..
दि. 16/06/2025 रोजी अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा नायगाव येथे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

आज महाराष्ट्रभर शालेय शिक्षण वर्ष 2025 26 सुरू झाले असून राज्यातील पूर्ण शासकीय निम शासकीय शाळेत त्या त्या विभागाच्या प्रमुखांनी आठवी टाईम याच दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करावा अशा आदेश होते त्या आदेशाने महाराष्ट्रभर हा विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा होत असताना नायगाव येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत सुद्धा हा विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला .

सदर विद्यार्थी प्रवेशोत्सव या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. आज यांच्याच उपस्थितीत व निवासी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सह हा विद्यार्थी प्रवेश महोत्सव साजरा करण्यात आला . आज पहिल्याच दिवशी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मीनगिरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्प व शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी शालेय जीवनात स्पर्धेत टिकून रहाण्याकरिता वीद्यार्थ्यांनी कुणीकडेही विचलित न करता आपले पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केल पाहिजे. असे मत प्रमुख पाहुणे सहाय्यक समाज कल्याण अधिकारी मिनगिरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.



