Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली

बिलोली तालुक्यातील कांगठी येथे तरुणाची पानटपरी जाळली; ८० हजार रुपयांचे नुकसान, फ्रिजसह साहित्य जळून खाक

रघुनाथ सोनकांबळे………

बिलोली तालुक्यातील कांगठी येथील किरण हाणमंत वाघमारे (वय २५) या तरुणाची पानटपरी अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत पानटपरीतील साहित्य, फ्रिज व इतर वस्तू जळून खाक झाल्याने सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
किरण वाघमारे यांचे वडील चार महिन्यांपूर्वी दिनाक: 18 फेब्रुवारी 2026 रोजी तीर्वझटक्याने दुःखत निधन पावले होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत किरण हा तरुण पानटपरी व्यवसाय करून आपल्या उदरनिर्वाहाचा आधार निर्माण करत होता. मात्र, अज्ञात व्यक्तींनी पानटपरीला आग लावल्याने त्याचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून त्याच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
Img 20260628 Wa0005
Img 20260628 Wa0005
या घटनेत २५ हजार रुपये किमतीचा फ्रिज तसेच पानटपरीतील इतर साहित्य व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. कष्ट करून कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या या तरुणाचा उदरनिर्वाहाचा आधार हिरावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Img 20260628 Wa0007
Img 20260628 Wa0007
याप्रकरणी किरण हाणमंत वाघमारे यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पीडित तरुणाला शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button