Latest Newsआपला जिल्हानायगांव

नरसी येथील श्री एकदंत गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत सूर्यवंशी, उपाध्यक्षपदी श्रीकांत सुर्यवंशी तर सचिवपदी श्याम पललवाड यांची निवड

रघुनाथ सोनकांबळे….

 

नायगाव तालुक्यातील नरसी येथे श्री एकदंत गणेश मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते श्री एकदंत गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत सूर्यवंशी, उपाध्यक्षपदी श्रीकांत सुर्यवंशी तर सचिव पदी श्याम पललवाड यांची निवड करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नरसी येथे प्रसिद्ध असलेल्या श्री एकदंत गणेश मंडळाची कार्यकारणी ची बैठक दि.५ ऑगस्ट रोजी श्री एकदंत नगर येथे नंदकिशोर टोकलवाड, सामाजिक कार्यकर्ते लालबा सुर्यवंशी, जेष्ठ पत्रकार गोविंद टोकलवाड नरसीकर, देवीदास सुर्यवंशी, रमाकांत सुर्यवंशी, परमेश्वर लोहगावे, शंकर टोकलवाड, शिवाजी सुर्यवंशी, सुभाष सुर्यवंशी, दिलीप टोकलवाड, दिलीप सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते पुढील प्रमाणे कार्यकारणी निवड करण्यात आली असून यात अध्यक्षपदी प्रशांत सूर्यवंशी उपाध्यक्षपदी श्रीकांत सुर्यवंशी, सचिवपदी श्याम पललवाड, कोषाध्यक्षपदी शुभम भेदे, सदस्य पदी चंद्रकांत सूर्यवंशी, क्रिष्णा नरसीकर, निवृत्ती सूर्यवंशी, अनिल भेदे, पांडुरंग निलेवार, साईनाथ सूर्यवंशी, अंतेश्वर सूर्यवंशी, देवीदास तोटरे, शंकर सुर्यवंशी, खंडू कांबळे, यशपाल सूर्यवंशी, यांची निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button