Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव बा.येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन विविध उपक्रमांनी साजरा..

रघुनाथ सोनकांबळे…
नायगाव बा. महात्मा फुले कॉलनी येथे कुशिनारा बुद्ध विहार विकास समिती व भीम जयंती मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 वा महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धाभावाने व सामाजिक एकतेच्या संदेशासह साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर समता सैनिक दल महिला मंडळाच्या वतीने मानवंदना अर्पण करण्यात आली.
या वेळी नायगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण व त्यांचे सहकारी नगरसेवक प्रमुख उपस्थित होते. या मान्यवरांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून बाबासाहेबांचे कार्य, विचार व सामाजिक परिवर्तनातील योगदानाची आठवण करून दिली.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने कुशिनारा बुद्ध विहारी विकास समिती व भीम जयंती मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तरुण मंडळांनी चांगला प्रतिसाद देऊन रक्तदान केले. सदर रक्तदानाचे शिबिर शासकीय संस्थेकडून करण्यात आले होते. या शिबिरात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला होता. ज्यांनी या शिबिरात रक्तदान केले अशा रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महात्मा फुले कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित हा कार्यक्रम दिवसभर विविध उपक्रमांनी भरलेला होता. सायंकाळी ठीक सहा वाजता शहरातील मुख्य रस्त्यांमार्गे कॅन्डल मार्च काढण्यात आला. बाबासाहेबांच्या प्रतिमेसह शांततेचे आणि समानतेच्या आदर्शांचे प्रतीक असलेला हा कॅन्डल मार्च मोठ्या उत्साहात पार पडला. या सकाळपासून च्या सायंकाळपर्यंत कार्यक्रमाला नायगाव पोलीस स्टेशनच्या वतीने चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमाला शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
रात्री नऊ वाजता बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित नागरिकांनी, आंबेडकर अनुयायानी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




