आयएसओ नामांकन मिळालेल्या ईकळमाळ ग्रामपंचायत ची दुरावस्था नागरिक त्रस्त.
रस्ते ,पाणी, विज , समशान भूमीनाही तरीही सरपंच व ग्राम विकास अधिकारी गप्प..

कुंटूर प्रतिनिधी..दि..(२९)
नायगाव तालुक्यातील कुंटूर जवळील एक किलोमीटर अंतरावर असलेले मौजे ईकळमाळ येथील गावाची परिस्थिती अत्यंत दुरावस्था झाली आहे. गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता व विज पाण्याची समस्या अनेक वर्षापासून दिसून येत आहे
.सदर मागासवर्गीय वस्ती व मातंग व बौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये सदर नालीचे घाण पाणी रस्त्यावरून वाहते . त्यात नाली बांधकामही झाले नाही ,काही ठिकाणी नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने सदर नाली तुटून पडली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, त्यातच नागरिकांना नळाचे पाणीही शुद्ध मिळत नसून घाण पाण्याने तहान भागावे लागत असून काही ठिकाणी हातपंप तसेच असून त्यात नाली चे घाण पाणी जात आहे

.गावात वर्षभर स्वच्छता होत नाही, ग्रामसेवक व सरपंच हे लक्ष देत नसल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले आहे. सदर ग्राम पंचायत हे आयएसओ नामांकन म्हणून गेल्या दोन वर्षाखाली ह्या ग्रामपंचायतीला मानाचा एक तुरा मिळाला आहे .मात्र कोणत्या गोष्टीमुळे आयएसओ नामांकन मिळालं असं सवाल येथील नागरिक करत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पाणी वीज व समशानभूमीची सोय नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे .त्यामुळे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी लक्ष देऊन सदर गावामध्ये शुद्ध पाण्याचे ,पाणी रस्ते वीज व साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.



