नायगाव तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडल्या
१८ परीक्षा केंद्रावर २,५३९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नायगाव.रघुनाथ सोनकांबळे..दि..(९)
दिनांक:09/02/2025 रोजी नायगाव तालुक्यातील पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.परीक्षा सुरळीत पार पडाव्यात या साठी गट शिक्षणाधिकारी प.स.नायगाव संग्राम कांबळे यांनी व शिक्षणविस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांनी भेटी दिल्या.
इयत्ता 5वी साठी 11 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली या वेळी आवेदनपत्र भरलेल्या 1420 विद्यार्थ्यांपैकी 1374 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इ.8 वी परीक्षेसाठी 1198 पैकी 1165 विद्यार्थ्यांनी 7 परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली.
सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून नियोजन करण्यात आले होते.प्रत्येक केंद्रावर भेटी देण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली होती.गट शिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाना व शंकरराव चव्हाण हायस्कूल कोलंबीसह अनेक केंद्रांना भेटी दिल्या.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तालुका परीक्षा समन्वयक म्हणून प्रशांत सोनटक्के , सर्व विशेष शिक्षक, विशेष तज्ज्ञ व विषय साधनव्यक्ती यांनी परिश्रम घेतले.परीक्षा केंद्रावर त्या त्या भागातील पोलीस ठाण्या मार्फत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .



