नायगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून अवैद्य रेतीने भारलेल्या हायवा ट्रकची चोरी… दोघाविरुद्ध नायगाव पोलिसात गुन्हा दाखल..

नायगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून अवैद्य रेतीने भारलेल्या हायवा ट्रकची चोरी… दोघाविरुद्ध नायगाव पोलिसात गुन्हा दाखल..
.रघुनाथ सोनकांबळे दि. (६) चोरीच्या घटनेची अधिक माहिती अशी की… काल दि.5 रोजी नायगाव तहसीलच्या हद्दीतील बरबडा या ठिकाणी अवैद्य रेती वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक एका सामाजिक कार्यकर्त्याने पकडून संबंधित मंडळाधिकारी यांना घटनेची माहिती दिल्याने महिला मंडळ अधिकारी शितल स्वामी यांनी तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांना संबंधित घटनेची माहिती देऊन वजीरगाव व कहाळा येथील तलाठी हसनापल्ले व कार्लेकर यांना सोबत घेऊन बरबडा गाटले.
बरबडा येथे जाउन संबंधित कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून अवैद्य रेतीने भरलेला हायवा ट्रक क्रM H 26BE1614 हा ताब्यात घेतला व दुसरा हायवा ट्रक ताब्यात घेण्याअगोदरच तेथून फरार झाला असल्याची माहिती मंडळाधिकारी शितल स्वामी यांनी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांना देऊन त्यांच्याच आदेशाने कुंटूर चे पोलीस कर्मचारी सोबत घेऊन सदर रेतीने भरलेला हायवा ट्रक तहसील कार्यालयात सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान पोलिस बंदोबस्तातआणून जमा करण्यात आला .
परंतु तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जमा केलेला अवैध रेतीने भरलेला हायवा ट्रक रात्रीच अंधाराचा फायदा घेऊन हायवा ट्रकचा मालक आणि चालक यांच्या संगनमताने तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून चोरून नेल्याचे दि. 6 रोजी सकाळी सर्व कर्मचारी व तहसीलदार यांच्या निदर्शनास आले. दंडात्मक कार्यवाहीसाठी आणून लावलेला तहसील कार्यालयाच्या प्रांगणामधील रेतीने भरलेला हायवा ट्रक चोरी गेल्याचे निदर्शनास येताच आज आज रोजी येथे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी संबंधित मंडळाधिकारी, तलाठी, आणि नायब तहसिलदार यांना सोबत घेऊन नायगाव ठाणे गाठले.
.तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभा असलेला हायवा ट्रक रेती सह रात्री अंधाराचा फायदा घेऊन तहसील कार्यालयाच्या प्रांगणामधून हायवा ट्रक मालक लोकडू भगवान मोरे रा. टाकळी त .ब. व चालक अजय देविदास मोरे रा. टाकळी त.ब. यांनी संगणमत करून चोरून नेल्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडून नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी यांनी नायगाव पोलिसात दिली .नायगाव पो.स्टे. येथे कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून ट्रक मालक लोकडू भगवान मोरे व चालक अजय देविदास मोरे दोघेही रा. टाकळी त .ब. तालुका नायगाव खै. यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 36/2025… कलम 303 (2)BNS सहकलम म .ज. म.अ. नियम 1966 कलम 48 (7) (8) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सध्या दोन्ही आरोपी फरार असल्याने तपास पोलीस निरीक्षक मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बिटजमदार साईनाथ सांगवीकर हे करीत आहेत.
विशेष रात्री उशिरा गुन्हा दाखल होईपर्यंत तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी पोलिस ठाण्यात तळ ठोकून बसुन होते.
सदर प्रकरणी असे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने परिसरातील वाळूमाफिया चे धाबे दणाणले असून सदर कार्यवाहीमुळे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन व कौतुक होताना दिसत आहे.



