आपला जिल्हानांदेडनायगांवमहाराष्ट्र

शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात मुलीची संख्या वेगाने पुढे,खा.प्रा.रविंद्र चव्हाण

नायगाव प्रतिनिधी..दि…(२४)
………………………………………………
महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या जोडप्याने 1847 रोजी मुलीच्या शैक्षणिक धोरणाविषयी उभी केलेली चळवळ ही झिरो टक्के ते सहा पॉईंट एवढी असताना आज शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक सांस्कृतिक राजकीय व क्रीडा क्षेत्रात मुलीची संख्या अग्रगण्य असून मुलींनी समाजापुढे एक आव्हान तयार केल्याचे आज घडीला दिसून येत आहे असे मत खा.प्रा.रवींद्र चव्हाण यांनी जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वकृत्व स्पर्धा कार्यक्रमात व्यक्त केले.

नायगाव शहरातील एज्युकेशन सोसायटी संचलित जिल्हा पातळीवरील अमृतराव पाटील चव्हाण वकृत्व स्पर्धा आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा . प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण तर उद्घाटिका अँड अस्मिता एकनाथराव मोरे यासह स.पो.नी. श्रीधर जगताप, ज्येष्ठ संचालक केशवराव पाटील चव्हाण,प्राचार्य डॉक्टर के हरिबाबू,माजी प्राचार्य ह.सं.खंडगावकर,गोविंदराव मेथे पानसरे महाविद्यालयाचे डॉ. चौधरी, वंदनाताई चव्हाण, सौ .सोनियाताई चव्हाण, संगमनाथ कौटिकवार, प्रवेशक माधवराव वाघमारे किनाळकर, प्राचार्य के जी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी अमृतराव पाटील चव्हाण व स्वर्गीय खा. वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन मान्यवरांनी केले.खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांनी खासदार पदावर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच जनता हायस्कूल येथे आले असता त्यांचे लेझीम पथक व सौ ऊप्पलवार यांच्या संगीत संचा कडून स्वागत करण्यात आले.

मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर प्रस्ताविकातून शाळेचे ध्येय धोरण व उद्दिष्टे याबाबत प्राचार्य के. जी. सूर्यवंशी यांनी आपले मनोगत मांडले .तर सदर स्पर्धेतील मुलीचे शिक्षण काल आज आणि उद्या या विषयावर अँड.अस्मिता मोरे यांनी मार्गदर्शन केले पुढे बोलताना खा.रविद्र  चव्हाण म्हणाले की लोकनेते कै. बळवंतराव चव्हाण व त्यांच्या सहकारी यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्ष करण्याचे काम स्वर्गीय खा. वसंतराव चव्हाण यांनी केले असून या संस्थेतून हजारो विद्यार्थी घडले आहेत या पुढेही माझी व संस्थेची जबाबदारी राहणार आहे असे ते म्हणाले.

यावेळी प्रो. डॉ .बलभीम वाघमारे,प्रा. बालाजी गायकवाड,प्रा. हनुमंत हांडे, माजी प्रा. मोहनराव चव्हाण, प्रा. वा.ल.श्रीमंगले यासह मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण, उपमुख्याध्यापक वाय टी चव्हाण प्रवेशक एच डी शिंदे, प्रा. पी.डी. जाधव, महादेव सोमवार, सौ प्रा शोभा शिंदे संस्थेतील प्राध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते .तर सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वसंत माने यांनी व आभार डॉक्टर गणेश देवडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button