Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कुबल यांच्या हस्ते रेखाताई बनसोडे यांना ‘लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार’

सामाजिक सेवेत उल्लेखनीय योगदानाची दखल

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव ….

 

शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारप्रवाहातून प्रेरणा घेऊन समाज upliftment साठी सतत कार्यरत असलेल्या मौजे शेळगाव छत्री (ता. नायगाव) येथील कामाई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखाताई बनसोडे देवकर यांना ‘लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार’ जाहीर झाला असून, प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कुबल यांच्या हस्ते मुंबई येथे गौरविण्यात आले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या भव्य सोहळ्यात विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या प्रसंगी दिग्दर्शक मनमोहन देसाई, अभिनेता रोहित कोकाटे, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, आयुष्यमान भारतचे अध्यक्ष ओमप्रकाश शेट्टे तसेच संस्थेचे अध्यक्ष सुरेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक सेवेतील निस्वार्थी समर्पण, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत सौ. रेखाताई बनसोडे देवकर यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला. त्यांच्या कामाई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत अनेक वर्षांपासून सामाजिक बालक आश्रम यशस्वीरीत्या चालविण्यात येत असून, गरजू व वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
या सन्मानानंतर शेळगाव छत्री तसेच नायगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, तानाजी पाटील आणेराये, अशोक कुंभार, भास्कर पाटील आणेराये, साईनाथ महाराज, गौरी गुरू व त्यांचा संच, सय्यद अशीफा, बालाजी वारले, संजय लांडगे, बालाजी आर्मी, संतोष किन्हाळकर, सुनंदा जोगदंड, मनमथ मालेगावे आदींनी रेखाताई बनसोडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Img 20251102 Wa0027
Img 20251102 Wa0027
मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कुबल यांच्या हस्ते सौ. रेखाताई बनसोडे देवकर यांना ‘लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार’ प्रदान करताना उपस्थित मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button