Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

एमपीएससीत घवघवीत यश; आंतरगावकर ज्ञानेश्वर शिंदे यांची PSI पदावर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने निवड..

रघुनाथ सोनकांबळे….

नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील सुपुत्र  ज्ञानेश्वर बालाजीराव पाटील शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत PSI पदासाठी नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानशा गावातून मोठे स्वप्न पाहत ज्ञानेश्वर शिंदे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर हे यश मिळवले. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. “आमचे छोटे बंधु… नांदेड जिल्हा टॉपर…” अशा गौरवपूर्ण शब्दांत गावकऱ्यांनी त्यांच्या कामगिरीचा सन्मान केला.
ज्ञानेश्वर शिंदे यांच्या यशानिमित्त आंतरगाव परिसरात अभिनंदनाचे फलक झळकले असून विविध स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.  बळवंत उर्फ माऊली गोविंदराव पाटील शिंदे यांनीही विशेष अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या.या यशामुळे नायगाव तालुक्याच्या शैक्षणिक व स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून, “मेहनत केली तर यश नक्की मिळते,” हे ज्ञानेश्वर शिंदे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button