Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगाव तालुक्यात युरिया खताची खुलेआम लूट; कृषी दुकानदारांचे संगनमत, तालुका कृषी अधिकारी ‘मूकदर्शक

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव…

नायगाव तालुक्यातील कृषी दुकानदारांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने युरिया खताची विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या सर्रास लुटीकडे तालुका कृषी अधिकारी उघड्या डोळ्याने पाहत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही दुकानदारांना पाठीशी घालून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Screenshot 20251229 205718 Youtube
Screenshot 20251229 205718 Youtube
खरीप व रब्बी हंगामाच्या तोंडावर युरिया खताची तीव्र गरज असताना, या संधीचा गैरफायदा घेत खत विक्रेत्यांकडून मनमानी दर आकारले जात आहेत. नियमबाह्य दर, जबरदस्तीने इतर खतांची ‘टॅगिंग’, रोख रकमेची अट अशा प्रकारांनी शेतकऱ्यांची सरळसरळ लूट केली जात असून, कृषी प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
Screenshot 20251229 205915 Youtube
Screenshot 20251229 205915 Youtube
या पार्श्वभूमीवर छावा संघटनेच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व कृषी दुकानदारांची तात्काळ तपासणी करावी, जादा दराने युरिया विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, दोषी दुकानदारांचे परवाने रद्द करावेत तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
Img 20251229 Wa0017
या Img 20251229 Wa0017
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार थांबवला नाही, तर छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आता प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस पावले उचलणार की लुटारूंच्या पाठीशी उभे राहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button