Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

नायगाव तालुक्यात पावसाअभावी आले शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट… शेतकरी चिंताग्रस्त..

रघुनाथ सोनकांबळे
महाराष्ट्र सह नायगाव तालुक्यात मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी झाला होता. त्याचा आनंदात त्यांनी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच काही प्रमाणात आपली पेरणी आटोपून घेतली .तर काही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या नंतर पेरणी करून घेतली. तेव्हापासून आजपर्यंत नायगाव परिसरात व तालुक्यात पावसाचा थेंबही बरसला नाही.
20250623 141401
20250623 141401
 शेतकऱ्यांनी वेळोवेळी हवामान शास्त्र खात्याकडून पेरणी संदर्भात माहिती घेऊन सुद्धा शेतकरी राजा पेरणी उरकून घेतला होता. आज त्याच शेतकरी राजाला पावसाअभावी पेरणी दुबार करण्याचे संकट ओढवले असून शेतकरी राजा मात्र चिंतातुर झाला आहे. जून महिना संपत आला तरी पण या नायगाव तालुक्यात व परिसरात पावसाचा थेंबही बरसला नाही.
दररोज शेतकरी आभाळाकडे पाहून आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल अशा आशयात चिंतातुर झाला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतली आहे अशांचे पीक केवळ वाऱ्यावर डोलताना दिसत आहे. पण त्याला आत्ताच्या घडीला चांगल्या पावसाची गरज असून येवढ्यात जर पाऊस पडला तर शेतकऱ्याचे बातबित आहे. नाहीतर शेतकरी राजा खूप मोठ्या संकटात सापडणार आहे.
अशातच नायगाव व परिसरात पाऊस पडावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी देवदेवतांना भंडारे ,नैवेद्य करून पाऊस पडण्यासाठी देवाकडे याचना करीत असताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button