Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटनेतील मृतांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली.

रघुनाथ सोनकांबळे

 

युवा साहित्यिक: सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रम रद्द

   गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करून. युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

 

दरेगाव तालुका नायगाव येथील कार्यकर्ते सोनू दरेगावकर यांनी मी कसा घडलो संयोजन समिती नांदेडच्यावतीने, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या १२ जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने, अनेक उपक्रम दरवर्षी मित्र परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात येतात. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संवेदनशील भावनेतून आजचा वाढदिवस सोहळा रद्द करून. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो अशी प्रार्थना करून शहरातील आयटीआय जवळील मीडिया ग्रासिक्स यातून घटनेतील मृतांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, अविनाश पाईकराव, मनोज वाघमारे, विनोद पाचंगे, सचिन कपाळे, रोहित वाघमारे, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे यांनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button