Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

धोबी समाजाला मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करा, डेबूजी फोर्सची मागणी

रघुनाथ सोनकांबळे

नायगाव ..

 

देशातील १५ राज्य व दोन केंद्रशासित प्रदेशात मागासवर्गीय प्रवर्गात असलेल्या धोबी समाजाला महाराष्ट्रातही मागासवर्गीय प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य डेबूजी फोर्स च्या वतीने नायगाव तहसीलदार श्रीमती धम्मप्रीया गायकवाड यांना प्रांत अध्यक्ष कैलास तेलंग टेभुर्णीकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
Img 20251010 Wa0013
Img 20251010 Wa0013
महाराष्ट्र परिट धोबी समाज सेवा मंडळ व डेबूजी फोर्सच्या लढाउ संघटनेच्या वतिने दि.१० ऑक्टोबंर रोजी राज्यातील जिल्हाधिकारी व तहसीलदारांना शांततेच्या मार्गाने मागण्यांचे निवेदन देण्याबाबतचा निर्णय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.
राज्यातील सरकारने शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी मागणी करणाऱ्या धोबी मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करुन द्यावा अशी मागणी संपूर्ण राज्यात करण्यात आली आहे.
राज्यातील महायुती सरकार धोबी समाजाला न्याय देत नसेल तर रस्त्यावर उतरून तिर्व आंदोलन करण्याचा इशारा कैलास तेलंग यांनी सरकारला दिला आहे.या वेळी सूर्यकांत सोनखेडकर, गंगाधर मावले, विठ्ठल अण्णा वडपत्रे,बालाजी तळणीकर,शंकर वडपत्रे,दिलीप लोंडे,व्हिकी कौठेकर,शिवाजी वडपत्रे,मारोतराव हूसेकर नामदेव गंगावळ, योगेश बेनाळकर व साईनाथ गंगावळ सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button