Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

रामतीर्थ पोलीस ठाण्यातील सपोनि श्रीधर जगताप यांना निरोप तर सपोनि विक्रम हराळे यांचे स्वागत

रघुनाथ सोनकांबळे..
रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांची बदली दि.१२ जुन रोजी झाल्याने त्यांना पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांच्या वतीने आज दि.१३ जुन रोजी नरसी येथील पोलीस चौकीच्या प्रांगणात निरोप देण्यात आला तर त्यांच्या जागी नुकतेच रुजू होऊन पदभार स्विकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांचे पोलीस, नागरिक व पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
Img 20250614 Wa0027
Img 20250614 Wa0027
  रामतीर्थ पोलीस ठाण्यात आपला सोळा महीन्याच्या  सेवेचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीने पुर्ण करणारे कर्तृत्व दक्ष, मनमिळावू  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांना मोठ्या भावूक वातावरणात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देवून पुष्पवृष्टी करीत सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून निरोप देण्यात आला.
Img 20250614 Wa0028
Img 20250614 Wa0028
तर त्यांचे जागी परभणी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातून बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांचे याचवेळी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी नरसी येथील पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, यादवराव भेलोंडे, नयुम पटेल, जेष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, गोविंद नरसीकर, गंगाधर गंगासागरे, आनंदराव सुर्यवंशी, धम्मदीप भद्रे, मुस्तफा कुंचेलीकर, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमालाच्या सुरूवातीस अहमदाबादहून लंडनकडे जाणारं एअर इंडियाचे विमान मेघाणीनगर परिसरात तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं. या अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना देखील करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button