Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
राज्य महिला आयोगाकडून राहुल जिंगळेकर यांच्या तक्रारीवर चौकशीचे आदेश
रघुनाथ सोनकांबळे
नायगाव :- नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राहुल दत्ता जिंगळेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. जिंगळेकर यांनी दिलेल्या अर्जात नायगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश पवार व तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्याशी संबंधित प्रकरण मांडले असून, धम्मप्रिया गायकवाड यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्याने संबंधित तहसीलदार रजेवर असताना संबंधित आमदाराने तहसीलदार यांच्या कार्यालयातील त्यांच्या खुर्चीला हार टाकून अपमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या समुपदेशक दुर्गा लांघी यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, संबंधित तक्रारीची चौकशी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी करून पाच दिवसांत अहवाल सादर करावा, असे नमूद करण्यात आले आहे.
या आदेशामुळे जिंगळेकर यांच्या तक्रारीला राज्य पातळीवर महत्त्व प्राप्त झाले असून, प्रकरणातील घडामोडींवर स्थानिक स्तरावर उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
—



