Latest Newsआपला जिल्हानांदेडबिलोली

गागलेगाव गणात मारोती उर्फ स्वराज लिंगनवाड यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; तरुणाई व नागरिकांमध्ये उत्सुकता

रघुनाथ सोनकांबळे..

बिलोली :आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गागलेगाव गणात राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे  मारोती उर्फ स्वराज गंगाधरराव लिंगनवाड यांना उमेदवारी द्यावी, अशी चर्चा सर्वदूर नागरिकांमध्ये रंगत चालली आहे.
नवतरुण, अभ्यासू व सरळधोपट स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे मारोती लिंगनवाड यांनी सामाजिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी व माता-भगिनींसाठी महामंडळ बससेवेचा प्रश्न मांडून त्यावर समाधानकारक मार्ग काढणे, विविध आंदोलने व उपोषणातून स्थानिक प्रश्नांना आवाज देणे, गरजू नागरिकांना मनसेमार्फत तातडीची मदत उपलब्ध करून देणे, तसेच शेतकरी बांधवांसाठी कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका जनमानसात ठसलेली आहे.
राजसाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आणि  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर चाहते म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली असून गटातील सर्वच विभागात त्यांनी सकारात्मक प्रतिमा निर्माण केली आहे.
गागलेगाव पंचायत समिती गटात लिंगनवाड यांना उमेदवारी दिल्यास त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय मिळू शकतो, असा ठाम विश्वास नागरिक, तरुणाई, महिला व जेष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. गावा-गावात, गल्ली-गल्लीमध्ये त्यांच्या नावाची चर्चा रंगत असून संपूर्ण गणात आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button