Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव
नायगाव नगरपंचायतीत संविधानाचा उघड अपमान! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला डावलत ‘फोटो डाउनलोड’ कार्यक्रम – दोषींवर देशद्रोहसदृश गुन्ह्याचा आरोप**

नायगाव तालुका
प्रतिनिधी…
प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा जाणीवपूर्वक अपमान केल्याची गंभीर घटना नायगाव नगरपंचायतीत घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन करत अधिकृत प्रतिमा न लावता केवळ “फोटो डाउनलोड” नावाचा कार्यक्रम आयोजित करून संविधान आणि राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नायगाव नगरपंचायतीत आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अधिकृत प्रतिमा न लावता ध्वजारोहण व इतर कार्यक्रम पार पाडण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमास नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गंधाली पवार, नगराध्यक्ष अर्चना संजय चव्हाण, उपाध्यक्ष विजय शंकरराव चव्हाण, नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. इतक्या जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही घटना घडणे म्हणजे केवळ निष्काळजीपणा नसून जाणीवपूर्वक केलेले शासन आदेशांचे उल्लंघन असल्याचा आरोप होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मुख्याधिकारी गंधाली पवार निलंबित करून यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व लोकप्रतिनिधी यांच्यावर कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.




