Latest Newsआपला जिल्हानांदेडनायगांव

महामानवांचे विच्यारच जिवनाला आकार देतात.समतादुत

रघुनाथ सोनकांबळे नायगाव…

 

जिवनात प्रगती साधायची असेल तर महामानवांचे विच्यार आत्मसात करावे लागेल असे गौरौद्वगार समतादुत दिलीप सोंडारे यांनी केले.
दि.19 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सह्मय विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी )पुणे नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी धुप्पा ता.नायगांव येथील किडस कॕम्पस ईंगलीश स्कुल येथे ” महामानवांचे समता विच्यार “यावर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता त्यावेळी विद्याथ्याऀना समतादुत मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षतेपदी संस्थेचे अध्यक्ष श्री सुहास पाटील टाकळीकर होते.पुढे बोलताना समतादुत म्हणाले महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आनण्याचे मौल्यवान काम केले.म्हणुनच आज बार्टिच्या व समाज कल्याण च्या योजनांचा लाभ घेऊन बरेच विद्यार्थी परदेशी शिक्षण घेत आहेत.आपण सुद्धा आपले ध्येय साध्य करण्यासाठी लाभ घेण्याचे आव्हान केले.यावेळी विवीध योजनांची माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रम सह्मयक आयुक्त समाज कल्याण नांदेड चे  शिवानंद मिनगीरे बार्टिचे जिल्हा प्रकल्प आधिकारी  मुंजाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button