Latest Newsआपला जिल्हानांदेडमहाराष्ट्र

कवळे पतसंस्थेचा सतत प्रगतीचा आलेख — २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत विश्वासार्ह प्रवास..

रघुनाथ सोनकांबळे……

नांदेड जिल्ह्यातील  कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेने नुकतीच आपली २४ वी वार्षिक सर्वसाधारण एमव्हीके वाघलवाडा सभा पार पडली असून, आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. यंदा एकूण व्यवसायात २३% वाढ नोंदवली गेली असून, निव्वळ नफा ₹७६.४६ लाखांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे १५% लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Img 20250913 Wa0024
Img 20250913 Wa0024
संस्थेच्या ठेवी ₹२९३.४१ कोटी, स्वनिधी ₹१२.७१ कोटी आणि कर्जवाटपातून येणारी रक्कम ₹१८८.७३ कोटी इतकी असून, आर्थिक सक्षमता आणि शिस्त दाखवणारे हे आकडे मानले जात आहेत. यावर्षी ५,२७७ नव्या सभासदांची भर पडली असून, एकूण सभासदसंख्या आता ४३,९२४ वर पोहोचली आहे.
Screenshot 20250913 195358 Whatsappbusiness
Screenshot 20250913 195358 Whatsappbusiness
संस्थेच्या २० शाखा, ज्यात मुख्य कार्यालयही नवीन मोंढा नांदेड येथे समाविष्ट आहे, पूर्णपणे CBS प्रणालीवर कार्यरत असून, AEPS आणि मिनी एटीएमद्वारे सदस्यांना ₹१०,००० पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Screenshot 20250913 195311 Whatsappbusiness
Screenshot 20250913 195311 Whatsappbusiness
NPA प्रमाण केवळ २.६४% असून, निव्वळ NPA शून्य आहे. ‘अ’ दर्जा मिळवलेली ही संस्था १००% संचालक व कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून दर्जेदार सेवा देण्याचा आश्वासन देते.सामाजिक क्षेत्रातही संस्था पुढाकार घेत आहे. अपघातग्रस्तांना मदत, शाळांना संगणक व प्रोजेक्टर वाटप, तलावांची गाळमुक्ती आणि नालासंवर्धन यांसारख्या उपक्रमांमुळे संस्था सामाजिक जबाबदारी निभावत आहे.
Img 20250913 Wa0023
Img 20250913 Wa0023
रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना, संस्था भविष्यातील आर्थिक संधी शोधून नव्या सेवा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करत आहे.पतसंस्थेचे अध्यक्ष आणि लोक कल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजींनी सभेत योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व सभासद, कर्मचारी, ठेवीदार यांचे आभार मानले. कार्यक्रमाला व्हिपीके पतसंस्थेचे व्हॉइस चेअरमन  माधवराव पाटील बोडके,संचालक  प्रभाकरराव पाटील पुयड,  गणेशराव पाटील सरसे, अनिलजी काचावार,  अनिलजी दर्डा, संभाजीराव बैनवाड,  मारोतराव किनेवाड,  किशनराव रॅपनवाड,सौ. सागरताई कवळे सौ. क्रांतीताई नाद्रे, व्हिपीके उद्योग समूहाचे सिईओ संदीप पाटील कवळे, सह जेष्ठ धर्माबाद मार्केट कमेटीचे माजी सभापती दत्ताहरी पाटील चोळाखेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हिमायतनगर सुभाषजी राठोड, देविदासजी बोमनाले, संस्थेचे सचिव नागनाथजी पांचाळ, सिईओ अन्नाराव पाटील, आर्थिक सल्लागार उदयकुमार कुलकर्णी, जनरल मॅनेजर नामदेवराव इंगोले सह सर्व शाखेचे शाखाव्यवस्थापक, अधिकारी कर्मचारी बांधव सह परिसरातील सर्व शेतकरी, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार आणि भाग भांडवलदार उपस्थित होते. सूत्रसंचालन अहवाल वाचन व्ही.एन सोळंके  तर आभार बाळू उबाळे यांनी मानले.अनेक मान्यवरांनी कवळे गुरुजींचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button